सोलापूर जिल्हा परिषदेची तीन महिन्यानंतर झालेली कालची सभा चांगलीच गाजली. दुपारी दीड वाजता सुरू झालेली ही सभा संध्याकाळी सात वाजता संपली. विविध विभागाचे सुमारे 40 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगातील 85 कोटी रुपयांच्या निधी वाटपावरून या सभेत शेवटी चांगलाच गोंधळ झाला. यातील शिंदे सेनेच्या सदस्यांना किती निधी आहे याचे उत्तर द्या अशी मागणी शिवराज म्हेत्रे यांनी केली. भाजपच्या सदस्यांना 90 लाख आणि शिंदे सेनेच्या सदस्यांना 45 लाख हा दुजाभाव कशाला.. यावरून उपाध्यक्ष इंद्रजीत पवार विरुद्ध शिंदे सेनेच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर शिंदे सेनेच्या सदस्यांनी सभा त्याग केला. समान निधी देण्याच्या अटीवर आम्ही झेडपीत एकत्र आलो. मात्र भाजपकडून डावलले जात असल्यामुळे आता झेडपी मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पाहायला मिळेल.









