सोलापूर – सोमाणी ह्युंदाई , सोलापूर येथे मंगळवारी सायंकाळी नवीन Hyundai Bayon या कारचे शानदार अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, स्टेट बँक ऑफ इंडिया चे प्रादेशिक व्यवस्थापक आनंद पाठक, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आणि सोमाणी उद्योग समूहाचे चे व्यवस्थापकीय संचालक केतन सोमाणी यांच्या शुभहस्ते या नवीन कारचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोमाणी ह्युंदाई चे व्यवस्थापकीय संचालक केतन सोमाणी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गाडीचे लॉन्चिंग करून पाहुण्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल तसेच येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी मनोगत व्यक्त करून सोमाणी हुंदाई चे कौतुक केले.
नवीन Hyundai BAYON मध्ये आकर्षक SUV डिझाइन, प्रशस्त इंटिरियर, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशा सुविधांचा समावेश आहे. या गाडीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन असून ते 115 PS पर्यंतची कमाल शक्ती निर्माण करते. ग्राहकांच्या पसंतीनुसार मॅन्युअल आणि iVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत व Bose प्रीमियम साउंड सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारख्या सुविधा, निवडक व्हेरिएंटनुसार उपलब्ध आहेत.
Hyundai Bayon ही आधुनिक डिझाइन, आकर्षक लूक, प्रगत तंत्रज्ञान आणि आरामदायी प्रवासाची वैशिष्ट्ये असलेली कार म्हणून ग्राहकांसमोर सादर करण्यात आली.या गाडीची किमत फक्त 9,99,900 रू पासून सुरूवात होत आहे.
नवीन Hyundai BAYON चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील Generative AI Voice Assistant. हे तंत्रज्ञान चालकाला नैसर्गिक भाषेत संवाद साधण्याची सुविधा देते. Perplexity आणि SoundHound AI यांच्या तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली प्रवासाचे नियोजन, हवामानाची माहिती, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बातम्या आणि क्रीडा विषयक माहिती मिळविण्यास मदत करते अशी माहीत सोमाणी Hyundai चे सेल्स ग्रुप हेड अमोल जाधव सर यांनी सांगितले.
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर हे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा, दर्जेदार वाहनांचा अनुभव आणि विश्वासार्ह विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. नवीन Hyundai Bayon च्या लॉन्चिंगमुळे सोलापूरमधील वाहनप्रेमींना ह्युंदाईच्या नवीन उत्पादनाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमात सोमाणी ह्युंदाईचे व्यवस्थापन, कर्मचारी, ग्राहक आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.













