काँग्रेस सातत्याने भाजपवर टीका करत आहे, आणि चुकीचा नॅरिटीव्ह देशात पसरवण्याचे काम करत आहे. न्यायव्यवस्थेवर अविश्वास निर्माण करत आहे,याचा बदला घेण्यासाठी आता लोकतंत्र बचाव अराजकता हटाव हे ब्रीदवाक्य घेऊन भाजप काँग्रेस विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आंदोलन 4 नोव्हेंबर रोजी सोलापुरात करणार असल्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील हेरिटेज लॉन्स या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आमदार माजी आमदार तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन हजार कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी व्यवस्था करा अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. हे आंदोलन कोणत्या ठिकाणाहून सुरू होणार…आंदोलनामध्ये कोण कोणते भाजपचे नेते सहभागी होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू असे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले.








