पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1718 शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे.
या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर (CSC) जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर यापूर्वी 24 जुलै 2026 रोजी 26.16 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 19 सप्टेंबर 2026 रोजी 4.20 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी 3.19 लाख शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 24.67 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय लाभार्थी :-
छत्रपती संभाजीनगर 206450
अमरावती 85076
नागपूर 30738
नाशिक 14244
पुणे 11928
कोकण 2756
शेतकऱ्यांनी यादीत नाव तपासून थकबाकीची खातर जमा करावी तसेच आधार प्रमाणीकरणा नंतर रक्कम खात्यात जमा होईल .चौथी यादी ही लवकर प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे .सहकार आयुक्त दीपक तावरे यांची माहिती










