राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
येस न्यूज मराठी नेटवर्क : केंद्र सरकारसोबत साखरेच्या एमएसपी संदर्भात तसेच इतर मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या समवेत आज झालेली बैठक निष्फळ ठरल्याने शेतकरी आंदोलनाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजता कोगनोळी येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केला आहे.
उद्या सकाळी ११ वाजता कोगनोळी येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.











