ताज्या आकडेवारीनुसार इथेनॉल निर्मितीत मक्याने साखर-आधारित स्रोतांना मागे टाकले आहे. जून 2026 अखेर देशात एकूण 717 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. यापैकी 258 कोटी लिटर इथेनॉल केवळ मक्यापासून तयार झाले. तर ऊसाचा रस आणि मोलॅसिससह साखर-आधारित स्रोतांमधून 238 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला.म्हणजेच मक्यापासून साखर-आधारित स्रोतांपेक्षा सुमारे 20 कोटी लिटर अधिक इथेनॉल मिळाले. एकूण इथेनॉल पुरवठ्यात धान्याचा वाटा तब्बल 67 टक्के, तर साखर-आधारित स्रोतांचा वाटा 33 टक्के आहे.यामध्ये मक्याचा एकट्याचा वाटा सुमारे 36 टक्के आहे. यामुळे इथेनॉलसाठी साखर उद्योगावरील अवलंबित्व कमी करून धान्याधारित उत्पादनाला सरकारकडून चालना मिळत असल्याचे चित्र आहे. 2012 -13 पेट्रोलमध्ये अवघे पाच टक्के इथेनॉल मिक्स केले जात होते मात्र जुलै 2026 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स केले जात आहे हे विशेष.






