पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा.
अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने एक विशेष व स्नेहपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमासाठी ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…











