सोलापूर : श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार, दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शिवानुभव मंगल कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.गणेशोत्सवानिमित्त मंडळातर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सांस्कृतिक, आरास, लेझीम, शिस्तबद्ध मिरवणूक, ढोल पथक, झांज पथक या स्पर्धा तसेच चार विशेष गुण गौरव पुरस्कर प्राप्त मंडळाचे बक्षीस वितरण समारंभ शनिवारी पोलिस आयुक्त एम. राजकुमार , नगरसवेक डॉ. किरण देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे, सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बु, उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत वानकर, अरुण रोडगे, सोमनाथ भोगडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सन २०२५ मधील विजेत्या मंडळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सांस्कृतिक स्पर्धा -प्रथम – कार्यसिद्धी लंबोदर गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ,द्वितीय – ‘आपला गणपती प्रतिष्ठान’, महेश थोबडे नगर, शेळगी, सोलापूर, ‘मोरया प्रतिष्ठान’, महेश थोबडे नगर, शेळगी, सोलापूर / सोन्या मारुती. आरास स्पर्धा- प्रथम ‘कसबा गणपती’ प्रतिष्ठान तरुण मंडळ,द्वितीय’वीर बाल तरुण मंडळ’, राठी हॉस्पिटल जवळ, टिळक चौक, सोलापूर, ‘श्री मालक गणपती’ व्यापारी मंडळ, भुसार गल्ली, सोलापूर.
लेझिम स्पर्धा – प्रथम ‘बाळीवेस तरुण मंडळ’,द्वितीय – ‘विश्व गणपती’ सोमवार पेठ तसेच ‘कुबेर गणपती’ गोल चावडी तरुण मंडळ,तृतीय – ‘राणा गणपती’ विजापूर वेस तरुण मंडळ.शिस्तबद्ध मिरवणूक-प्रथम ‘सावजी गणपती’, द्वितीय ‘भोईराज तरुण मंडळ’ ‘राजस्थानी युवक मंडळ’, ‘प्रताप तालिम तरुण मंडळ.
ढोल पथक -प्रथम – ‘विश्व विश्वविनायक’ तरुण मंडळ. झांज -प्रथम – ओम मित्र मंडळ, कुचननगर, शिवशक्ती मित्र मंडळ, खड्डा, भवानी पेठ. विशेष गुण गौरव – थोरला मंगळवेढा, पाणिवेस तालिम, श्री समर्थ तरुण मंडळ तसेच मानाचा आजोबा गणपती.
पत्रकार परिषदेला ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, विजय पुकाळे, कैलास मेंगाणे आदी उपस्थित होते.










