सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावावर नुकत्याच 65 ते 70 वयोगटातील जेष्ठ नागरिकांच्या जलतरण स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सोलापूरचे शशिकांत पाटील यांनी पन्नास मीटर आणि शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक गटात राज्यस्तरीय सिल्वर पदक मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे,नांदेड,कोल्हापूर,मुंबई, यवतमाळ आधी विविध जिल्ह्यातील 800 स्पर्धक सहभागी झाले होते. अर्थक्रांती जीवन गौरव अभियान पुणे आणि अखिल भारतीय मारवाडी युवा मंच सोलापूर यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. शशिकांत पाटील यांच्या यशाबद्दल खंदक बागेतील हरळी प्लॉट योगासन मंडळ, तसेच मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत जाधव, शंकराव खंडागळे, डॉक्टर प्रवीण ननवरे, प्रकाश बिराजदार, शिवाजी सुरवसे यांनी शशिकांत पाटील यांचे कौतुक केले.











