• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2026
in Blog
0
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
2
VIEWS

स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा शेळकेवाडीचा देशात ६३वा क्रमांक; महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळेला राष्ट्रीय गौरव

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या कामगिरीत सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे) या शाळेने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन (Swachh Evam Harit Vidyalaya Rating – SHVR) 2025-26 स्पर्धेत देशभरात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेने ९०.८० गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त करत देशातील १९१ उत्कृष्ट शाळांमध्ये ६३वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही एकमेव

जिल्हा परिषद शाळा ठरली असून, या यशामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याच्या सुविधा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, हरित परिसर, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाश्वत विकास या विविध निकषांवर देशभरातील हजारो शाळांचे बहुपदरी मूल्यमापन करण्यात आले.

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कठोर छाननीनंतर देशातील केवळ १९१ शाळांची राष्ट्रीय गौरवासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये शेळकेवाडी शाळेने अव्वल कामगिरी करत देशात ६३वे स्थान मिळवले.या स्पर्धेत देशातील अनेक सहभाग घेतला होता. मात्र, महाराष्ट्रातून केवळ शेळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेनेच राष्ट्रीय स्तरावरील निवडीत स्थान मिळवत राज्याचा झेंडा उंचावला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश राज्यातील सर्व शाळांसाठी प्रेरणादायी मानले जात आहे.*या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेचे अभिनंदन करत, ग्रामीण शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा हा राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील इतर शाळांनीही शेळकेवाडीचा आदर्श घेऊन अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनीही गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांचे व शाळेचे मुख्याध्यापक भागवत भाटेकर व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करत, हे यश सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणारी ही कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.*तसेच जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी देखील शाळेचे अभिनंदन करून, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे गौरवोद्गार काढले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील दाद असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET-NCERT) यांनी अधिकृत पत्राद्वारे शाळेच्या राष्ट्रीय गौरवासाठी निवडीची माहिती दिली असून, लवकरच आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय गौरव समारंभात शाळेचा सन्मान करण्यात येणार आहे.या ऐतिहासिक यशामुळे सोलापूर जिल्हा परिषद, सांगोला तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाही योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण उपक्रम, शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, याचा आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी हिने देशासमोर निर्माण केला आहे. ही कामगिरी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

Related Posts

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू
Blog

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!
Blog

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

July 14, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Blog

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
Blog

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 12, 2026
पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी
Blog

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

July 12, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
Blog

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026