• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अहिल्यानगरला…

by Yes News Marathi
November 8, 2025
in इतर घडामोडी
0
कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अहिल्यानगरला…
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२५-२६ सालची ५१वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अहिल्यानगर येथील विश्वंभरा प्रतिष्ठान व अक्षय दादा कर्डिले युवा प्रतिष्ठान बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुऱ्हाणनगर येथे आयोजित केली आहे.

यातून कर्नाटक येथे होणाऱ्या ४४व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक संघातील खेळाडू निवडीसाठी ही प्रमुख स्पर्धा आहे.

या स्पर्धेसाठी कुमार-मुली १८ वर्षाखालील म्हणजेच ५ जानेवारी २००८ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत. तसेच कुमार-मुलीसाठी वय उंची वजन २५० असे मूल्यांकन असेल.

कुमार-मुली खेळाडू जास्तीत जास्त बी.ए., बी.कॉम., बी.एससी. प्रथम वर्ष अथवा त्याखालील वर्गात शिकत असला पाहिजे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जे कुमार-मुली दहावी उत्तीर्ण आहेत त्यांनी त्यांचे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट व जे १२ उत्तीर्ण व त्याखालील इयत्तेत आहेत, त्यांनी दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.

संलग्न जिल्हा संघानी आपली नोंदणी एक डिसेंबर २०२५ पर्यंत [email protected] या मेलवर विहित नमुन्यात पाठवून द्यावी, असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी कळविले आहे. राज्यातील संलग्न जास्तीत जास्त संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.

Previous Post

संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम…

Next Post

अपूर्वाई”ने सजली प्रिसिजन गप्पांची संध्याकाळ!

Next Post
अपूर्वाई”ने सजली प्रिसिजन गप्पांची संध्याकाळ!

अपूर्वाई”ने सजली प्रिसिजन गप्पांची संध्याकाळ!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In