‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘जाने भी दो यारो’ सारख्या कलाकृतींमधून विनोदी अभिनयाची हुकूमत गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
मैं हूं ना, साराभाई’ आणि ‘जाने भी दो यारो’ सारख्या चित्रपटांसह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले आहे . किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. 74 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे .

