श्री रूपा भवानी मंदिर सोलापूर येथे सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाचे निमित्ताने 51 वैदिक पूरोहीताना दुर्गा सप्तशती पुस्तकांचे वाटप समारंभ पूर्वक करण्यात आले.


या गीता गहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री
श्रीरंग महाराज औसेकर यांचा संकल्पनेतून,सोलापुरची कुलस्वामिनी श्री रूपा भवानी मंदिर येथे गीतागहन सोलापुर शाखे चे अध्यक्ष श्री शिवानंद सावळगी व फाउंडेशन चे सदस्य यांचा हस्ते 51 पुरोहितांना या सप्तशती ग्रंथाचे वितरण करण्यात आले,
यावेळी बोलताना या फाउंडेशनच्या स्थापने मागचा हेतू व नियोजित समाजहिताच्या योजनांची माहिती महाराजांनी दिली.



यावेळी श्री रूपा भवानी देवी मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी व गीता गण फाउंडेशन शाखा सोलापूर चे पदाधिकारी तसेच पुरोहित मंडळी आणि देवीभक्त उपस्थित होते.

