सोलापूर : सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्या जवळीक असणारे, विश्वासू आणि पृथ्वीराज माने युवा मंच उत्तर सोलापूर समन्वयक अजय सोनटक्के यांच्या यशस्वी कारकीर्दीचा प्रवास आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समाजकार्य आश्वासक, हरहुन्नरी, लोकभावनेचा आदर निर्माण करणारे, दिलीप माने यांची विश्वासू म्हणून तिऱ्हे गावातील मल्लाव समाजातील गावकर्यां सोबत विशेष उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. मल्लाव समाजात कोणत्याही सुखदुःखात सहभागी होणारे उमलते नेतृत्व म्हणून त्यांचा अजय सोनटक्के यांचा सहवास आहे.
परीट समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी आपली वाटचाल २०१६पासून उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष म्हणून त्यानीं सुरुवात केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून, तरुणांना संघटित करून आणि सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपले नेतृत्व वेगळे ठरवले. या कार्याची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ संघटनाला बळकटी दिली नाही तर समाजातील अनेकांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारसरणी, कार्यतत्परतेमुळे त्यांना महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. हे यश त्यांच्या नेतृत्वक्षमतेचे आहेच, पण त्याचबरोबर समाजाच्या असलेल्या विश्वासाचा ठोस पुरावा आहे दैदिप्यमान, उतुंग आणि यशस्वी कारकीर्द आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. समाजासाठी झटणारा, प्रत्येकाशी आपलेपणाने वागणारा आणि सर्वांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असणारा माणूस म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. २७ जुलै रोजी,पंढरपूर येथील आनंदी मंगल कार्यालयात महाराष्ट्र (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक, लॉन्ड्री प्रदेश अध्यक्ष गोविंदराव राऊत, तंटामुक्ती प्रदेश अध्यक्ष शांतीलाल कारंडे, सचिव सुनिल फंड, लॉन्ड्रीचे कार्याध्यक्ष अनिल खडके (हुपरीकर), वरिष्ठ उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या उपस्थितीत त्यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्ह्यात परीट समाजाच्या दहावी,बारावी स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धात्मक गुण मिळवून विद्यार्थी,राजकीय,समाजिक,शासकीय क्षेत्रात व राज्य कार्यकारिणी,सोलापूर जिल्हा कार्यकारणी नवनियुक्ती विद्यार्थ्यांचा चिन्ह,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले, आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा ही सत्कार सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्याप्रकरणी आलेल्या समाज बांधवांचे पंढरपूर शहरा चे शहराध्यक्ष सुनील कारंडे यांनी आभार व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .












