• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना निघाले जगन्नाथ पुरीला, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दाखविला हिरवा झेंडा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना निघाले जगन्नाथ पुरीला, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दाखविला हिरवा झेंडा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फित कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ही रेल्वेचे श्री जगन्नाथ पुरी कडे प्रयाण झाले. या तीर्थयात्रेचा कालावधी दि. 11 ते 16 फेब्रुवारी 2025 असा असणार आहे.

  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ओरिसातील श्री जगन्नाथ मंदिर पुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, रेल्वे विभागाचे मॅनेजर श्री सोना, वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेअंतर्गत श्री जगन्नाथ पुरी कडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी तीर्थ दर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफ सोबत असून या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी समाज कल्याणच्या सहाय्यक श्रीमती सोनवणे यांनी ओरिसा येथील पुरी या ठिकाणी असलेल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच या कालावधीत या नागरिकांसोबत असलेल्या वैद्यकीय स्टाफ व समाज कल्याणच्या स्टाफ ची ओळख संबंधितांना करून देण्यात आली. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9.30 वाजता या नागरिकांना घेऊन रेल्वेने पुरी कडे प्रस्थान केले.

  " देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर र्धार्मयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे.

  पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणी दिनांक 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी या कालावधीत तीर्थ दर्शनास जाणेकरिता मान्यता मिळालेली आहे. 

 या नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर आणि पॅरामेडीकल स्टाफ (नर्स) तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील दहा अधिकारी व कर्मचारी सोबत असणार असून तीर्थ दर्शनास जाणे करिता रेल्वे आरक्षित करण्यात आली होती अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली. 

*नागरिकांमध्ये आनंद, उत्साह-
तीर्थ दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह, आनंद व श्री जगन्नाथ यांच्या भेटीची ओढ दिसून येत होती. तर ही भेट, हे दर्शन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून होत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येत होता.

Previous Post

खा.प्रणिती शिंदे यांची सोलापुरी चादरींच्या बनावट उत्पादनावर कारवाईची वस्त्रोद्योग मंत्र्यांना केली मागणी

Next Post

बाल पखवाजवादक वारकऱ्यांनी जिंकली भाविकांची मने

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
बाल पखवाजवादक वारकऱ्यांनी जिंकली भाविकांची मने

बाल पखवाजवादक वारकऱ्यांनी जिंकली भाविकांची मने

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026