• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचा एकही पाल्य शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 2, 2025
in इतर घडामोडी
0
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचा एकही पाल्य शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा एकही पाल्य केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांबाबतच्या  जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपअधीक्षक गृह विजया कुर्री, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

  जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र शासनाने शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे, त्यानुसार जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील आशा कामगारांचा एकही पाल्य शैक्षणिक शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, महापालिकेचे शिक्षण अधिकारी यांनी संबंधित विद्यार्थ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत. प्रलंबित असलेल्या अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन अर्ज परिपूर्ण करण्याबाबत सूचित करावे. तसेच शिष्यवृत्ती मंजूर असलेल्या व नव्याने शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. व ही सर्व कामे 15 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.   

   लाड पागे समितीच्या तरतुदीप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्मचारी आकृतीबंध मंजूर होणे आवश्यक आहे, आकृतीबंध मंजुरीची कार्यवाही करण्यात येत आहे. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. त्याप्रमाणे अन्य नगरपंचायतीमध्ये रिक्त पद, शैक्षणिक अर्हता, बिंदू नामावलीप्रमाणे नियुक्ती देण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.

 सफाई कामगारांसाठी मेडिक्लेम बाबत ज्या बँकेची मेडिक्लेम पॉलिसी कामगारांच्या अधिक फायद्याची आहे अशा बँकांची मेडिक्लेम पॉलिसी घेण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सफाई कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व खाजगी कॉन्ट्रॅक्टर यांनी कामगारांना धनादेशाद्वारे वेतन दिले पाहिजे, असे निर्देश आशीर्वाद यांनी दिले. तसेच सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या सफाई कामगारांमधील महिला कामगारांना एकत्रित करून त्यांचे बचत गट निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कामगारांची आरोग्य तपासणी नियमित करावी, त्यांना आवश्यक असलेले साहित्य वेळेत व दर्जेदार पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. 

 प्रारंभी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका श्रीमती पवार यांनी हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांसाठी नागरी भागात राबविण्यात येत असलेल्या  विविध योजनांची माहिती दिली. सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, रिक्त पदावरील नियुक्ती तात्काळ देणे, श्रम साफल्य योजना, सफाई कामगारांच्या निवासाची डागडुजी करणे, कामगारांसाठी असलेल्या सुविधा, ऋतू नुसार साहित्य उपलब्धता, आरोग्य तपासणी, मेडिक्लेम, किमान वेतन, आश्वासित प्रगती योजना, कामगारांना सुट्ट्या देणे, रोजंदारी कामगार बाबतची सविस्तर माहिती चे सादरीकरण पवार यांनी केले.
Previous Post

होटगी रोड विमानतळावरील विमान सेवा सुरू झाल्यावर ओला – उबेर ची सेवा सुरू होईल

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या ‘2025 दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन !

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या ‘2025 दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन !

सोलापूर विद्यापीठाच्या '2025 दैनंदिनी' डायरीचे प्रकाशन !

ताज्या बातम्या

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026