सोलापूर :- जिल्हा स्पर्धेत २०० खेळाडूचा सहभाग राज्य स्पर्धेसाठी आज रवाना. सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांन्दो स्पर्धेसाठी जिल्हयाचा संघ जाहीर झाला असून २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान होणा-या ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांन्दो स्पर्धेसाठी हा संघ उद्या जवळगावला रवाना होणार आहे. जिल्हा स्पर्धेतुन १४ मुले व १४ मुलीचा संघ निवडण्यात आला. व जिल्हा स्पधी उत्साहात तायक्वांन्दो फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत तायक्वांन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा तायक्वांन्दो संघटने तर्फे कमर फंक्शन हॉल नईजिंदगी येथे मंगळवार दि. १९/११/२०२४ रोजी सब ज्युनिअर तायक्वांन्दो स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेमध्ये जिल्हयातून २०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा स्पोर्टस कोन्सीलचे अध्यक्ष मोहन भुमकर, राजेंद्रसा शालघर (दर्शन गारमेंट), चनबसु माळगे जमिअत उलमा हिंद चे मनोद्दीन पठाण, हरिष शेख, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव मंजूर शेख, जिल्हा संघटनेचे खजिनदार प्रतिक्षा खंडाळकर मॅडम, आसिफ शेख सर तसेच तायक्वांन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष मिलिंद पटारे सर, आवासो बाघमोडे सर, वाजीद शेख सर, महेश गावडे सर, सचिन करंडे सर, यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व २१ ते २३ दरम्यान राज्य सब ज्युनिअर स्पर्धा होणार आहे. जिल्हयाचा मुलांचा संघ आरोप पल्लेलु, ध्रुव माने, आर्यन वाघमोडे, संदिप पंतवाले, स्वराज शिंदे, उमर आत्तार, प्रियदर्शी शिंगे, रमजान मुल्ला, अनिकेत पल्लेलु, अर्नव कांबळे, अनिकेत पल्लेलु, यज्ञेश माने, श्रेयांश शिगन, श्रेयश शिंदे, जिल्हयाचा मुलींचा संघ इशिता गायकवाड, ईश्वरी कुबडे, समृध्दी जाधव, मनस्वी बिराजदार, प्रणाली शिंदे, धनश्री लोखंडे, स्वरा पवार, स्वरा बनसोडे, आराध्या कांबळे, स्वामीनी कुलकर्णी, साधना उकली, जॉयस संगमा, विजयी खेळाडूंना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिव यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार करुन त्यांचे कौतुक केले.