सोलापूर: गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा भाजपने विकास केला नाही.आज तालुका जिल्ह्यात पिछाडीवर पडला आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण’मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून लढणार असून या पार्श्वभूमीवर त्यांनी हत्तूर,सिंदखेड,होनमुर्गी,औराद संजवाड, राजुर,बोळकवटे, हत्तरसंग,कुडल, बरूर, चिंचपूर या गावात तसेच सोलापुरातील
प्रभाग क्रमांक १९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६ याठिकाणी भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी प्रत्येक गावामध्ये व सोलापुरातील प्रभागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, घर तेथे शिवसैनिक व गाव तिथे शिवसेनेची शाखा स्थापन करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, बुथ प्रमुख, गट प्रमुख व बी. एल. ए. यांच्या नेमणुका करणे या आदी कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते यावेळी मंचावर
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती,
विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले,संतोष पाटील, महेश पाटील (होनमुर्गी) , तालुका प्रमुख योगीराज पाटील,लता राठोड,लता दास,
रवी कांबळे, शरणराज केंगनाळकर,राजू बिराजदार,राहुल गंधुरे,बालाजी चौगुले, मीनल ताई दास,लता दास, राजू कोळी, सुरेश शेंडगे,संगण्णा हत्तरसंग,आमसिद्ध बगले,सोमनाथ बगले,राम चौगुले,अनिल पाटील,राम वाकसे,किरण बिदरकोटी, सुनील शिंदे,संजू वाकसे,अनिल वाले,संतोष बंदपट्टे ,अली पिरजादे,पंचप्पा कुमठे,सचिन गंधुरे,सचिन माने,अण्णा खांडेकर,बबलू खरात,अनिरुद्ध दहिवडे, मयुरेश धानगोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अमर पाटील म्हणाले,
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर वडापूर येथे धरणाची उभारणी करु,
सीना-भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवू, तालुक्यातील कालवे, तलाव दुरुस्ती करून तिथे उजनी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू.
मंद्रूपला तालुका घोषित करून तिथे नवीन एमआयडीसी, उपबाजार समिती, नवीन मेडिकल, इंजिनिअरिंग आणि आयुर्वेदिक कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करू.मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक मशीनरी, नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ.
शेतातील वीजेचे डीपी नवीन बसवू तसेच नवीन वीज उपकेंद्र उभारून नदीकाठी व मतदारांसंघात चोवीस तास वीजपुरवठा करण्याचा आपण संकल्प केला आहे.दुधाला जास्त भाव आणि पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत.
तालुक्यातील प्रत्येक गावात, सोलापुरातील प्रभागामध्ये मजबूत रस्ते बनवू, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, गावोगावी आणि सोलापूर शहरात रोज पाणीपुरवठा करू, आधुनिक ड्रेनेज करू,तसेच बाल उद्यान केंद्र, क्रीडा संकुलन,ओपन जिम,योगा सेंटर उभारू,ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देऊ.जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर करून येथे शासकीय सिव्हिल हॉस्पिटल, नवीन प्रशस्त बसस्थानक,
नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तेव्हा जनतेनी विकासासाठी शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावेत असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.