सोलापूर : नेहरूनगर येथील जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यम प्रशाला येथे तिरंगा प्रतिज्ञा व नशा मुक्ती प्रतिज्ञा हाच कार्यक्रम आज रोजी शाळेच्या परिसरात घेण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार तिरंगा प्रतिज्ञा व नशा मुक्ती प्रतिज्ञा देण्यात आली याप्रसंगी प्रशालेतील इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी सुहानी गावित हिने नशा मुक्ती प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
तसेच तिरंगा अभियानाची प्रतिज्ञा इयत्ता आठवी वर्गातील कुमार काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य विजय रत्न चव्हाण पर्यवेक्षक श्री म्हमाणे एम एल व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेची क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच संतोष जाधव यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करून प्रतिज्ञा घेतली.