• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2024
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील वाचन चळवळ वाढावी हीच अपेक्षा : डॉ. सुहासिनी शहा

सोलापूर – पुस्तके वाचक लोकांचा समूह बनवून सोलापुरातील वाचन चळवळ वाढावी या अपेक्षेने या प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, असे मत प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले.

प्रिसिजन फाउंडेशन व आयएमए सोलापूर यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित प्रिसिजन वाचन अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ‘वॉकिंग ऑन द एज’ पुस्तकाचे लेखक प्रसाद निक्ते, आयएमए च्या डॉ.किरण सारडा ,आनंद अवधानी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. सुमेधा कंदलगावकर यांनी वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे अभिवाचन प्रेक्षकांसमोर सादर केले त्यानंतर दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ.सुहासिनी शहा बोलताना म्हणाल्या कि, प्रिसिजन गप्पांच्या समूहाप्रमाणेच प्रिसिजन वाचन समूह वाढवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयएमए हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.
आयएमएच्या डॉ. किरण सारडा यांनी प्रत्येकाच्या आयुष्यावर मित्र आणि पुस्तकांचा मोठा प्रभाव असतो म्हणूनच पुस्तकांनाच मित्र बनवावे व वाचनाच्या माध्यमातून मनाचा व्यायाम करावा या मनातील सुप्त इच्छेला मूर्त स्वरूप मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.

यावेळी वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर आनंद अवधानी यांनी आपल्या मनोगतात कुठलीही गोष्ट दोन बाबींवर अवलंबून असते एक म्हणजे इमॅजिनेशन व दुसरी इम्प्लिमेंटेशन या दोन्ही गोष्टी वाचन अभियानासही लागू आहेत असे सांगतानाच प्रिसिजन व आयएमएच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक शहराच्या आर्थिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक वैभव आता देखील वाढ झाली नाही तर शहराचे अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले शहराचे सौंदर्य हे वाचन संस्कृती वाढविण्यावरच अवलंबून आहे त्यासाठी प्रिसिजन व आयएमएने घेतलेला पुढाकार हा प्रत्येकाने स्वतः घेतलेला पुढाकार आहे समजून काम केल्यास सोलापूरला नवीन ओळख जागतिक स्तरावर मिळेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यानंतर वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे लेखक प्रसाद निक्ते यांनी सातपुडा पर्वत ते सह्याद्री पर्वत रांगांच्या ७५ दिवसातील हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासाच्या आठवणींना मुलाखतीच्या माध्यमातून उजाळा देत काही विशेष घडामोडी व घटनांवर प्रकाश टाकत प्रेक्षकांना प्रवासाबद्दल माहिती दिली. ७५ दिवसांच्या प्रवासात वेगवेगळ्या लोकांनी केलेली मदत व प्रवासात आलेले अनुभव यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील निकते यांनी उत्तरे देत कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निकते यांची मुलाखत माधव देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीधर खेडगीकर यांनी केले.

Tags: Great responsePrecision Reading Mission programSolapurkars
Previous Post

राऊंड टेबल व बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत आर आर पाटिल हायस्कूल बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण

Next Post

महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Related Posts

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
Next Post
महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

May 31, 2026
सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

May 31, 2026
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

May 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026