• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 3, 2024
in इतर घडामोडी
0
ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी
0
SHARES
1
VIEWS

पोलीस आयुक्त एम. राज कुमार : १०० जन्मठेपांबद्दल १०० सामाजिक उपक्रमाचा रक्तदानाने शुभारंभ

सोलापूर : जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले.

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल १०० सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते.

भारतमातेच्या प्रतिमापूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणे हे कौतुकास्पद कार्य आहे. १०० जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून १०० पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. ॲड. राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिले आहे. विधी क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, एखाद्या गुन्ह्यात वकिलाने गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हे अतिशय महत्त्वाचे काम असते. त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मेहनत करून पीडितांची बाजू मांडली आणि पीडितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाच्याही कामगिरीत सुधारणा दिसली.

जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले, जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणे अतिशय अवघड काम आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ॲड. राजपूत यांनी काम केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने ते सातत्याने कार्यरत असतात.

प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर ॲड. प्रियंका पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास अशोक संकलेचा, मदन मोरे, किरण सुतार, प्रशांत बडवे,व्यंकटेश कैंची, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवठेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲड. अजिंक्य जाधव, ॲड. अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांच्या सन्मानार्थ १२१ जणांनी रक्तदान केले. १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे रक्तदान करुन अभिनंदन करण्यात आले.

Previous Post

मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …

Next Post

गाळमुक्त धरण योजने अंतर्गतची सर्व कामे संबंधित यंत्रणांनी ऑगस्ट 2024 अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
गाळमुक्त धरण योजने अंतर्गतची सर्व कामे संबंधित यंत्रणांनी ऑगस्ट 2024 अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

गाळमुक्त धरण योजने अंतर्गतची सर्व कामे संबंधित यंत्रणांनी ऑगस्ट 2024 अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026