सोलापूर : सोलापूरच्या अक्कलकोट रोड येथील चव्हाण उद्योग समूहाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विदा या नव्या गाडीचे अनावरण सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पहिल्या दिवशीच १५ विदा गाड्यांचे बुकिंग सुद्धा करण्यात आले असून बुकिंग केलेल्या ग्राहकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विदा गाडीचे रिजनल सेल्स मॅनेजर हनिशा कालारा तसेच चव्हाण उद्योग परिवारातील कर्मचारी उपस्थित होते.