• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार; दिलीप मानेंना विश्वास

Yes News Marathi by Yes News Marathi
April 20, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार; दिलीप मानेंना विश्वास
0
SHARES
0
VIEWS

भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी केली. तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासही दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला.

महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावभेटी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ति-हे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शिवसेना नेते प्रकाश वानकर, शालिवाहन माने, अमर पाटील, संजय पोळ, बाळासाहेब शेळके, प्रल्हाद काशीद, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा दादाराव पाटील, भारत जाधव, गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप माने पुढे म्हणाले की, दहा वर्षांत कसलाही विकास झाला नाही, या जुमला सरकारांने अच्छे दिन म्हणत जनतेला फसवलं आहे. भाजपच्या फसव्या धोरणाविरोधात रोष असल्याने आता मतदारांनी निवडणूक ताब्यात घेतली असुन भाजपविरोधी प्रंचड वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी जनता यावेळी योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदार संघातुन प्रथम महिला खासदार म्हणुन प्रणितीताई शिंदे या संसदेत जाणार असल्याचा असा विश्वास माजी आमदार दिलीपराव माने यांनी व्यक्त केला.

भाजपला धडा शिकवा – प्रणिती शिंदे
या वेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपने मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन शेतकरी, तरुण, महिला मतदारांची फसवणूक केली आहे. शेती मालाला भाव नाही, कांद्याची निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे सोलापुरात एकही उद्योग आला नाही. परणामी तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्यासचीही खंत शिंदे यांनी बोलून दाखवली. त्यामुळं या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यावा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी देखील मागील दोन वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केलं. तर शिवसेना नेते प्रकाश वानकर यांनी देखील भाजपच्या फसव्या धोरणावर टीका करत यावेळी प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केलं.

प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण विधान सभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला. यामध्ये समशापुर, नंदूर, पाथरी, डोणगाव, कवठे, बेलाटी, हिरज, ति-हे, शिवणी, पाकणी या गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील महविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Dilip Manefirst woman MPparliamentPraniti ShindeSolapurTrust
Previous Post

माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक रूपाली ठाकूर यांची नियुक्ती

Next Post

देशाच्या विकास आणि समृद्धीसाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
देशाच्या विकास आणि समृद्धीसाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा

देशाच्या विकास आणि समृद्धीसाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026