बार्शी शहरातील नगरपालिका शाळा नं.१४ येथे निलेश मुद्दे यांच्या सहकार्याने आयोजित बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा,आरोग्य आणि कल्याणकारी उपाययोजना प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा कामगार नोंदणी शिबीराला बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय (नाना)राऊत यांनी भेट दिली.

बार्शी शहर व तालुक्यातील गोरगरीब बांधकाम कामगार यांना संकटात आधार देणे गरजेचे आहे,निलेश मुद्दे हा युवक व त्यांची संपूर्ण टिम अनेक वर्षापासून सामान्य माणसं केंद्रबिंदु समजून काम करत आहे,याप्रसंगी बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय(नाना) राऊत यांनी निलेश मुद्दे व संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी निलेश मुद्दे,शितल पाटील,दादासाहेब चोबे,प्रसाद फताले तसेच बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.