मिझोरम : ईशान्य भारतातील मिझोरमच्या विधानसभेच्या 40 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या झोरम पीपल्स मूव्हवेंट कलामध्ये बहुमत मिळाले आहे. पहिल्या कलात 29 जागांवर आघाडी घेतली आहे. मिझो नॅशनल फ्रंटला सात तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये झोरम पीपल्स मूव्हवेंट बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मिझो नॅशनल फ्रंटचे किंगमेकर होण्याचं स्वप्न भंगलं आहे.
राज्यात बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात झोरम पीपल्स मूव्हवेंटने 29 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटला सात जागांवरा आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र होते. मात्र सुरूवातीचे कल पाहता हे चित्र पूर्ण पलटले असून झोरम पीपल्स मूव्हवेंटला जनतेने कौल दिला आहे.
‘या’ दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला
लता उसेंडी (कोंडागाव), विक्रम उसेंडी (अंटागड), केदार कश्यप (नारायणपूर) आणि महेश गगडा (विजापूर) या चार माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे तुलनेनं 40 जागांचं राज्य कोण जिंकणार..याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे. माजी आयएएस अधिकारी नीलकंठ टेकम केशकलमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल हुपेंडी या भानुप्रतापपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं आमदार अनुप नाग हे अंतागढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.