मुंबई : एकनाथ शिंदे हे जर उद्धव ठाकरेंना बाहेर पडले नसते तर त्यांना ठार मारलं असतं, त्यांना जीवे मारण्याचा कट होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा का नाकारली असा सवालही त्यांनी केला. संजय गायकवाड यानी केलेल्या आरोपांनंतर आता पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाल्याचं चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांचे हात खेचले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिवंत नसते, असा खळबळजनक आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले उद्धवसाहेब देत होते, शिंदेंनी त्यांचे हातच घेतले. त्याला मी उत्तर दिलं की जर आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात घेतले नसते, तर आज कदाचित एकनाथ शिंदे आज जिवंत दिसले नसते. गडचिरोलीला एकनाथ शिंदे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी दिली होती.