सोलापूर-दि.15/8/23 या रोजी के. एल. ई. सोसायटी अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर येथे, भारतीय स्वातंत्र्याच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रशालेच्या भव्य मैदानामध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीत, महात्मा गांधीच्या प्रतिमेचेपूजन, NCC छात्र सैनिकांचे प्रतिज्ञा, विद्यार्थी भाषणे, खाऊवाटप अशा विविध उपक्रमांनी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेच्या परंपरेप्रमाणे, शालांत परीक्षा 2023 मध्ये प्रशालेत प्रथम आलेली गौरी पाटील, द्वितीय क्रमांक संस्कृती जाधव व त्यांचे पालक तसेच मुख्याध्यापक अनिल पाटील, प्राथमिक विभागचे मुख्याध्यापक सचिन पाटील या मान्यवरांनी ध्वजारोहण केले, त्यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे तिरंगी झेंड्यास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली, ध्वजगीत झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पुष्पहार व फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रशालेतील NCC छात्र सैनिक यांना NCC ची प्रतिज्ञा दिली व विविध विद्यार्थ्यांच्या गटसमूहांचे निरीक्षण केले.
प्रास्ताविकेतून प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी आज भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण स्वातंत्र्य दिन विविध प्रकारच्या उपक्रमांनी साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जन्मलो परंतु हे मिळविण्यासाठी अनेकांनी अन्याय, अत्याचार, त्रास सहन केला तर काहीनी या प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले. याचे सुराज्य आपणास बनवायचे आहे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाने उत्तुंग यश मिळवावे असा संदेश दिला.
ध्वजारोहण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनी गौरी पाटील व संस्कृती जाधव यांनी मनोगतातून आम्हाला मिळालेले यश हे प्रत्येक शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे फलित असून, विद्यार्थ्यांनी नियमितपणे ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावीत, गुरुजनांचे ऐकावे, ज्ञानोपासना करावी असे सांगितले.
याप्रसंगी प्रशालेतील सुप्रिया राठोड, विजय कोरे, शौर्य सुरवसे, अर्पिता चव्हाण, संध्या कन्नी या विद्यार्थ्यांनी भाषण केले. यांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व स्वातंत्र्य चळवळीविषयी सविस्तर माहिती मनोगतातून सांगितली.
प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या शुभहस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थी, एटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे,तसेच थ्रो बॉल स्पर्धेतील विजयी संघाला , प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली घाटे पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीशैल खुने यांनी केले. NCC छात्रसेनेला चीफ अफसर सिद्रामप्पा तंबाके,व थर्ड अफसर उर्मिला गिडवीर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रशालेचे 1985चे माजी विद्यार्थी, प्राध्यापक भुसनुरे, बसवराज कलशेट्टी, राजेश भूतनाळे, शिवशरण नवले, उमाकांत धनशेट्टी, बसवराज कारले, मुख्याध्यापक अनिल पाटील मुख्याध्यापिका सुरेखा म्हमाणे, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील, परिसरातील सर्व पालकवर्ग, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.