कोल्हापूर; जिल्हातील नव्यानेच झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेलाच एका मक्तेदाराने ठकवल्याचे प्रकरण समोर आले आहे रणजित विलास शिंगाडे (रा आवळे गल्ली) असे या मक्तेदाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, मनपा उपयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत दोन शाळा इमारतींच्या दुरुस्तीचे काम न करताच बनावट कागदपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण केल्याचे दाखवले तब्ब्ल तेरा लाख एकाहत्तर हजार सातशे दोन रुपयांचे बिल घेऊन महापालिकेला फसवल्याचा प्रकार समोर आला उपायुक्त डॉ ठेंगील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली गेल्या पंधरा दिवसामंध्ये हि दुसरी फसवणुकीची घटना महापालिकेमध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे यापूर्वी मक्तेदार शैलेश पवार याने महापालिकेला अठरा लाखांना अशाच पद्धतीने फसवले होते.
मात्र मक्तेदार पवार फरारी झाला आहे. संशयित मक्तेदार रणजित शिंगाडे याला शाळेच्या दोन इमारत दुरुस्ती चे काम दिले गेले होते मात्र त्याने हे कामच न करता नमुना क्र ६४ वर मोजमाप पुस्तिकेचा क्रमांक बनावट नमूद करून देयक प्रमाणपत्रे आदी बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण झाल्याचे भासवून तेरा लाख एकाहत्तर हजार सातशे दोन रुपयांचा धनादेश प्राप्त करत महापालिकेला तर फसवलेच आणि शासकीय निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हणले आहे.