सांगली; अलीकडील काळात सांगली जिल्ह्यात तसेच शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना ऊत आला आहे त्यासाठी तत्पर कारवाई करण्याच्या सूचना मी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत तसेच आता मी स्वतः एक मोबाईल क्रमांक नागरिकांना देणार आहे नागरिकांनी जिथे अवैध धंदे सुरु असतील तेथील तक्रारी थेट माझ्या मोबाईल नंबर वर कराव्यात नागरिकांनी माझ्याशी संवाद साधावा व्हाट्स अप आणि मेसेजिंग किंवा थेट मला संपर्क करावा तक्रारीची दखल घेतली जाईल असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
अवैध धंद्या विरोधात जिल्ह्यामध्ये मी कारवाई च्या सूचना दिल्या आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह इतर पोलीस ठाण्यांमधून विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत लवकरच मी एक मोबाईल क्रंमाक जनतेसाठी खुला करणार आहे नागरिकांनी त्या नंबर वर माझ्याशी संपर्क साधावा या नंबर चे नियंत्रण माझ्याकडे राहील तत्पर कारवाई होईल. सध्या जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री सह उत्पादन होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर खबरदारी प्रशासनाकडून घेत आहोत. यासाठी कृषी विभागाचेही सहकार्य आम्ही घेत आहोत सध्या बाजारात सुरु असलेल्या नशेच्या गोळ्या विक्रीकडेही आमचे बारीक लक्ष आहे आणि कारवाई सुद्धा आम्ही करत आहोत.
त्याचप्रमाणे ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. शेअर मार्केट आणि ऑनलाईन ट्रेडिंग च्या माध्यमातून अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याच्या घटना माझ्या निदर्शनास येत आहेत या फसवणुकीचे याकडेही चक्रावणारे आहेत या मोठ्या आकड्यांमुळे आम्ही तातडीने कारवाई करत आहोत त्यासाठी आमचे सायबर विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे पण नागरिकानाही माझी विनंती आहे कि कोणत्याही अमिषाला त्यांनी बळी पडू नये आणि फसव्या योजनांमध्ये अडकू नये.
जिल्ह्यातील महिला आणि विशेष करून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी असणारे निर्भया पथक आणखी गतीने काम करत असून यासाठी चांगले अधिकारीही नियुक्त केले आहेत ‘पोलीसकाका’ आणि ‘पोलीसदीदी’ हा उपक्रम आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये राबवत आहोत. शहर भागातील सध्या सुरु असलेली स्पा सेंटर सुद्धा आमच्या रडारवर आहेत काही स्पा सेंटर मधून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता तर आणखी असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व स्पा सेंटर आणि मसाज सेंटर च्या तपासणीचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत असे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी सांगितले.