सोलापूर दि.2 (जि.मा.का) :- सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर तालुका वगळून उर्वरीत अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, मोहोळ , बार्शी , मंगळवेढा, माढा ,पंढरपूर ,सांगोला, माळशिरस व करमाळा या 10 तालुक्यातून प्रत्येक तालुक्यास एक गोशाळा अनुदानासाठी निवड करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. अर्ज मागविण्यास पुनश्च मुदतवाढ देण्यात आली असल्याने पात्र गोशाळांनी 18 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. एस. सी. बोरकर यांनी केले आहे.
या योजनेचा उद्देश ,लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती , लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे आदीबाबत तालुकास्तरावर संबंधित पंचायत समिती पशुधन विकस अधिकारी ( विस्तार) , यांच्याकडे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना संपर्क साधून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या संबधीत तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या कडे दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत . जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्सम व्दारे सादर केलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
यापुर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेले अर्ज सादर कलेले ग्राहय धरले जाणार नसल्याने इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. असे आवाहनही जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. एस. सी. बोरकर यांनी केले आहे.