सांगली ( सुधीर गोखले) – महात्मा गांधी यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते आज सांगली मध्ये या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या त्यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मध्यवर्ती मारुती चौकात त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घातला आणि घॊषणाबाजी केली. संपूर्ण राज्यातून श्री भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून जोरदार निदर्शने होत आहेत विधिमंडळातही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. श्री संभाजी भिडे यांनी अमरावती सभेला उद्देशून बोलताना महात्मा गांधी यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती त्याचे पडसाद आज सर्वत्र उमटत असताना मात्र सांगलीमध्ये त्यांच्या प्रतिमेस कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालून समर्थन केले आहे.
आज सकाळी सांगलीमधील मध्यवर्ती असणाऱ्या शतृप्ती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तसेच श्री भिडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी मूळ चित्रफीत पाहून आरोप करावेत काही समाजकंटकांकडून श्री संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक सुरु आहे अमरावती मध्ये जरी गुरुजींवर गुन्हा दाखल झालेला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई जिंकूच पण गुरुजींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असा इशाराही शिवप्रतिष्ठान चे हणमंत पवार यांनी दिला