सांगली (सुधीर गोखले) – जिल्ह्यातील वारणा धारण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेला मुसळधार पावसाने धरण ऐशी टक्के भरले असून सध्या पायथा विद्युत गृहातून सुरु असलेला विसर्गामुळे आणि कोयना धरणातून पायथा विद्युत गृहातून सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी ची पाणी पातळी सांगलीच्या आयुर्विन पुलाजवळ सायंकाळी ७ वाजता १८ फूट नोंदवली गेली असून साधारण पाणी पातळी ३२ फुटावर गेली कि शहरातील काही भागात पाणी शिरण्यास सुरुवात होते त्यामुळे सुरु असलेला पाऊस त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने कृष्णा काठच्या पूरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्थलांतरित होण्याच्या सूचना आज दिल्या आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे हे पूरपट्ट्यातील नागरिकांशी संवाद साधत स्थलांतरित होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, या ठिकाणच्या नागरिकांना पूर्वपरिस्थिचा सामना प्रकर्षाने करावा लागतो त्यामुळे आज आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी या भागातील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांना संभाव्य पूरपरिस्थिती उदभवण्या आधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या.२०१९ आणि २०२१ साली सांगली शहराला आणि परिसराला महापुराचा मोठा तडाखा बसला होता. आजही त्या आठवणींनी सांगलीकरांच्या अंगावर काटा येतो अचानक वाढलेल्या पाणी पातळीने सर्वत्र धावपळ सुरु होती कित्तेक कुटुंबे घरामध्ये अडकून पडली. सध्या कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरु असून पाऊसाची संततधार जिह्यात सुरु आहे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासन एक्शन मोड वर आले आहे.
आज प्रामुख्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचेबरोबर आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे अग्निशमन विभाग प्रमुख सुनील माळी आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, प्राणिल माने, धनंजय कांबळे यांनी सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी येथील नागरिकांशी संवाद साधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मानसिकता तयार करण्याचे काम केले.
यावेळी आयुक्त सुनील पवार यांचेशी संवाद साधला असता
‘सध्याची परिस्थिती पहाता नागरी वस्ती सुरक्षित आहे पण आम्ही कोणताही धोका पत्कारायला आम्ही तयार नाही भविष्यात पावसाचा जोर वाढूही शकतो पाणीपातळीतही वाढ होऊ शकते यासाठी आज पूरपट्ट्यातील या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची मानसिकता तयार करत आहोत त्यांनी लवकरात लवकर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे आपले सामानहि हलवावे”