• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2023
in इतर घडामोडी
0
श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
0
SHARES
1
VIEWS

जिल्हा प्रशासनाकडून श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासाचा 173 कोटीचा आराखडा सादर

सोलापूर, दिनांक 24( जिमाका):-जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी केलेला 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा शासनाला त्वरित सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, नगर रचना सहायक कल्याण जाधव, भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील, मंद्रूप तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेली जमीन भूसंपादित करण्यासाठी कार्यवाही करावी. या विकास आराखड्यात किती जमीन आवश्यक आहे, तसेच त्यासाठी किती शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करावी लागेल व त्यासाठी द्यावा लागणारा मावेजा याबाबतचाही निधी आराखड्यात प्रस्तावित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

173 कोटीचा तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा सादर करत असताना यामुळे या भागात किती रोजगार निर्मिती होईल त्याचेही सर्वेक्षण करावे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच शासनाला प्रस्ताव सादर करत असताना प्रत्येक विभागाला किती निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्याचाही स्वतंत्रपणे उल्लेख करावा व संपूर्ण प्रस्ताव एकत्रित करून त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश श्री. विखे पाटील यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल विकास आराखड्याची माहिती दिली. कुडल संगम हे सोलापूर शहरा जवळील प्रमुख ऐतिहासिक महत्त्व असलेले एक अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भीमा आणि सीना या दोन नद्यांचे संगम होतो. जिल्ह्यातील अनेक सुंदर प्राचीन मंदिरापैकी कूडल येथील श्री संगमेश्वर आणि श्री हरीहरेश्वर मंदिर पाहण्याजोगे असून हे ठिकाण राज्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पूर्वीची 6 एकर जमीन असून नवीन 7.14 एकर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे. शेजारील आठ शेतकऱ्यांची ही जमीन असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देय राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामांची माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राज्य वीज वितरण कंपनी, भूसंपादन, महसूल, पोलीस, पुनर्वसन या विभागाच्या कामाची माहिती देऊन जल पर्यटन, लाईट अँड साऊंड शो, उद्यान विकास, वृक्ष लागवड, चिल्ड्रन पार्क या सर्व कामांची माहितीही त्यांनी दिली. या सर्व कामासाठी 173 कोटी 22 लाख 67 हजार 526 रुपये इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: Radhakrushana Vikhe PatilSri Kshetra Hattarsang Kudal
Previous Post

इन्स्पायर अवार्डसाठी कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची शहरस्तरीय निवड

Next Post

खरीप हंगाम पिक स्पर्धेचे आयोजन! पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
खरीप हंगाम पिक स्पर्धेचे आयोजन! पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

खरीप हंगाम पिक स्पर्धेचे आयोजन! पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026