सांगली (सुधीर गोखले) – जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने आता जिल्हा पोलीस ऍक्टिव्ह आणि ऍक्शन मोड मध्ये आले असून आज पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते गस्ती साठी बिट मार्शल संकल्पनेतील बिट मार्शल यांना देण्यात येणाऱ्या दोन चाकी गाड्यांचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पार पडला यावेळी आम सुधीर गाडगीळ तसेच महापौर दिग्विजय सूर्यवंशी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हागारी बाबत आढावा आणि चिंतन बैठक घेतली होती या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी गस्ती साठी बिट मार्शल नेमण्याबाबत माहिती सादर केली होती त्याप्रमाणे आज बीट मार्शल ना गस्तीसाठी आवश्यक दुचाकी गाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री खाडे म्हणाले, पोलीस यंत्रणा आधुनिक होण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे. गांजा, नशेच्या गोळ्यांसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडून काढणेच्या दृष्टीने ही अत्याधुनिक यंत्रणा नक्कीच उपयोगी पडणार आहे. शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक बसवराज तेली व त्यांची टीम ऍक्शन मोडवर येऊन अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील असा विश्वास आहे. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे मिरज ग्रामीण चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सुधीर भालेराव आदींसह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.