• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

औषधं, खाद्यपदार्थ स्वस्त, गाडी घेणं महागलं… GST बैठकीत काय स्वस्त, काय महाग?

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2023
in मुख्य बातमी
0
औषधं, खाद्यपदार्थ स्वस्त, गाडी घेणं महागलं… GST बैठकीत काय स्वस्त, काय महाग?
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यामध्ये ऑनलाईन गेमिंगला GST अंतर्गत आणणं, 28 टक्के कर लागू करणं आणि कर्करोगाच्या औषधांवरून IGST काढून टाकणं यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. जाणून घेऊया, कोणत्या वस्तूंवर दिलासा मिळणार आणि काय महागणार?

ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स
GST कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगला जीएसटी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेदरम्यान, आजच्या काळात ऑनलाईन गेमिंग उद्योगाचा प्रभाव किती आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकतं. या सर्व बाबींवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कार खरेदी करणं महागणार
जीएसटी कौन्सिलनं कार ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बैठकीदरम्यान विस्तृत चर्चा केल्यानंतर, बहुउद्देशीय कारवर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, जी 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त असेल. म्हणजेच, आता या श्रेणीतील वाहनं घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, सेडान कारवर 22 टक्के सेस लागू होणार नाही.

आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलताना, आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान, सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.

चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त
चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर सर्वांची एकच तक्रार असले, ती म्हणजे, चित्रपट गृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ. आतापासून खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावालाही परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

हे खाद्यपदार्थ स्वस्त
GST Council च्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या गोष्टींवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता कच्च्या किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

Previous Post

सोलापूर शहरातील बेकायदेशीर बांधकामांचे पोस्टमार्टम सुरू…

Next Post

डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती

डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026