• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सावरकरांची देशभक्ती व विज्ञाननिष्ठा अनुकरणीय

by Yes News Marathi
May 28, 2023
in इतर घडामोडी
0
सावरकरांची देशभक्ती व विज्ञाननिष्ठा अनुकरणीय
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व व हिंदूराष्ट्र याबद्दलचे विचार जरी वादग्रस्त असले तरी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची उत्कट देशभक्ती, तत्त्वनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मराठी भाषाशुद्धी, लिपी सुधारणा याबद्दलचे विचार आजही अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी आज (ता.28) देऋब्रा संस्थेच्या कार्यक्रमात केले.


येथील देऋब्रा शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखा, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था व कै.ल.गो. काकडे ट्रस्ट यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त दत्त चौकातील संस्थेच्या कार्यालयात व्याख्यान,निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.येळेगावकर बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात दयानंद महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख डाॕ.रेवा कुलकर्णी व डाॕ.येळेगावकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, महेश देशपांडे, हर्षल पाटील, दामोदर कुलकर्णी, जयतीर्थ पडगानूर,संदिप कुलकर्णी, उन्मेश कुलकर्णी , ऋषीकेश कुलकर्णी, अथर्व मुळेगावकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुबोध धामणगावकर, प्रचेत बागेवाडीकर, स्वप्निल भावार्थी, देऋब्राचे कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, उपाध्यक्ष शंकर कुलकर्णी, सहकार्यवाह विजय कुलकर्णी , रंगनाथ जोशी, प्रदीप जोशी, रविंद्र तुळजापूरकर, प्रा.शुभदा कुलकर्णी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर उपस्थित होते.

यावेळी डॉ.रेवा कुलकर्णी यांना पीएचडी मिळाल्याबद्दल तसेच समर्थ केटरर्सचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांचा संस्थेतर्फे शाल ,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. युवक शाखेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण डाॕ.रेवा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या निबंध स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात साक्षी सुराणा, महाविद्यालयीन गटात अवनी कुलकर्णी, तर खुल्या गटात पंढरपूरचे संतोष भोसेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अपूर्वा जोशी, गिरीजा आराध्ये, अरुण धुमाळ, सोनाली गिरी, स्मिता कोर्टीकर, श्वेता मैंदर्गीकर, गायत्री अघोर या बक्षीसपात्र स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डाॕ. नभा काकडे यांनी काम पाहिले. संजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रचेत बागेवाडीकर यांनी आभार मानले.

15 जणांनी केले रक्तदान

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था व देऋब्रा युवक शाखे, कै.ल.गो.काकडे ट्रस्टतर्फे आज घेण्यात आलेल्या शिबीरात 15 जणांनी रक्तदान केले.डाॕ.हेडगेवार रक्तकेंद्राने संकलन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी सुनिल हरहरे, डाॕ.सुशिल वाघमारे, गीता राठोड, अनिल जांभळे व विनायक कुलकर्णी उपस्थित होते.

Previous Post

चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ ..!

Next Post

एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

Next Post
एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group