• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी खा.धर्मण्णा सादुल काँग्रेसचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2023
in इतर घडामोडी
0
माजी खा.धर्मण्णा सादुल काँग्रेसचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर : तेलगू भाषिक व सोलापूरच्या विकासासाठी भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचं महत्त्वकांक्षी नेतृत्व मान्य केले आहे. उद्या मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या शहराध्यक्षांकडे राजीनामा सादर करणार आहोत असे स्पष्ट करतानाच आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या 10 जागा निवडून येतील, असा दावा काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
  • भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांच्याशी संपर्क साधून भारत राष्ट्र समितीमध्ये सक्रिय होऊन काम करण्याची ऑफर दिली. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून ते त्यांच्या संपर्कात होते. अनेक वर्षापासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. काँग्रेसने मला खासदारकी पर्यंतची मोठी संधी दिली असे सांगत धर्मण्णा सादुल हे भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार असल्याचे नाकारत होते मात्र अखेर आज सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तरुण व महत्त्वकांक्षी नेतृत्व असलेले के चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे जाहीरपणे सांगितले. लवकरच पक्षप्रवेशही करणार आहे, अशी घोषणा केली
  • पत्रकार परिषदेत माजी खा. धर्मण्णा सादुल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचं महत्त्वकांक्षी नेतृत्व स्वीकारण्याचे मी मान्य केले आहे. मूळचा मी तेलंगणाचा आहे, त्याचा मला अभिमान आहे. के. चंद्रशेखर राव हे यापूर्वीही संपर्कात होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी आग्रह केला. चर्चा झाली. त्यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे माजी खा. धर्मण्णा सादुल यांनी सांगितले. सोलापूर त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. त्यांची विकासात्मक दृष्टी पाहून काम करायला तयार झालो आहे, असे ते म्हणाले.
  • काँग्रेसने खूप काही दिलं. खासदारकीपर्यंतची संधी दिली याबद्दल माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मी ऋणी आहे. काँग्रेस सोडत असल्याचे दुःख होत आहे असे सांगतानाच काँग्रेसमध्ये सहा ते आठ माजी आमदार – खासदार आहेत मात्र नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश देत असताना या माजी लोकप्रतिनिधींना विचारात घेतलं जात नाही, असा आरोप माजी खा. सादुल यांनी यावेळी केला. मला साईडला ठेवण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे पण मी समाधानी आहे ,असेही ते म्हणाले.
  • सोलापुरात तेलगू भाषिकांची संख्या सुमारे तीन लाख आहे. ते तेलंगणातून बहुतांश आलेले आहेत. तेलगू भाषिक समाजाच्या समस्या सोडविणे आणि सोलापूरचा विकास भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून करायचा आहे. या भूमिकेतून हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या सुमारे दहा जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.
  • काँग्रेस पक्षाकडून समजूत घातल्यास निर्णय मागे घेणार का या प्रश्नाच्या उत्तरात माजी खा. सादुल म्हणाले की, आता अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे माघार नाही. उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देणार आहोत. जड अंतकरणाने काँग्रेस सोडत आहे, असेही सादुल यांनी स्पष्ट केले.
  • सोलापुरात भारत राष्ट्र समितीच्या आगमनामुळे राजकारणात मोठे ध्रुवीकरण होईल. हजारो कार्यकर्ते बी.आर. एस. मध्ये प्रवेश करणार आहेत. भारत राष्ट्र समितीचा फटका भाजपाला बसेल, असेही सादुल यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत रघुरामलू कंदीकटला, गणेश पेनगोंडा, विक्रम पिस्के आदी उपस्थित होते.
Previous Post

दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातल्याने आघाडीत बिघाडी?

Next Post

राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात हायकोर्टाचे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात हायकोर्टाचे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स

राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात हायकोर्टाचे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026