No Result
View All Result
- इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. 22 किंवा 23 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिन्याला सुरुवात होईल. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजानचा पहिला रोजा असणार आहे. मुस्लीम बांधव दरवर्षी रमजान महिन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
- यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात रमजान महिना सुरु होत आहे. त्यामुळे सुर्यास्त उशिरा होणार आहे. यंदाच्या वर्षी साधारण साडे तेरा ते चौदा तासांचे रोजे मुस्लिम बांधवांना करावे लागणार आहेत. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे. इस्लामिक कॅलेंडरमध्ये एकूण 12 महिने असतात. ही गणना चंद्रावर आधारित असल्याने प्रत्येक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे दरवर्षी रमजान महिना आणि ईद काही दिवस आधी साजरी होत असते.
- इस्माम धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फित्र असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.
- “रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी आणि संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं. दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज या महिन्यात आयोजित केली जाते. आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न गरिंबाना दान म्हणून दिले जाते. ज्याला जकात असे म्हटले जाते. रमजान महिन्यात सधन कुटुंबाकडून गरीब कुटुंबाना धान्य दिले जाते. त्याला फितरा असं म्हटलं जातं. त्यामुळे रमजाम महिन्यातील ईद ला ईद-उल-फित्र असे म्हणतात.” अशी माहिती मौलाना शेख मेहताब अन्वर जामई यांनी दिली.
No Result
View All Result