• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2023
in इतर घडामोडी
0
धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान
0
SHARES
1
VIEWS
  • उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एकदा गारपीट झाली. आठ दिवसांपूर्वी साक्री तालुक्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. शुक्रवारी साक्रीच्या माळमाथा परिसरात लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. गारपीटीमुळे रस्ते व शेतं बर्फाने आच्छादले होते. या गारपीटीमुळे गहू, हरबरा, मका, भाजीपाला तसेच फळबागांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. शेती क्षेत्राबरोबरचं घरांचं देखील नुकसान झाले आहे. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सरकार मदत करणार का?, असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
  • नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा : नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच जोडपलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये सतत पाऊस होतो आहे. चांदवड तालुक्याच्या दक्षिण – पूर्व भागात सुपारीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पडलेल्या गारांनी शेतात दोन ते तीन इंचाचा थर साचला होता. अभोण्यात दोन तास जोरदार पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. सिन्नर आणि मनमाड मध्येही जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या तडाख्याने नाशिक जिल्ह्यातील काढणीला आलेला गहू, कांदा, द्राक्ष, आंबा इत्यादी फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
  • पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील गंगावे, विटावे, भोयेगाव, हिरापूर पन्हाळे आदी भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारात जोरदार गारपीट झाली. त्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात देखील जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. अभोना परिसरात शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा, मिरची, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत हरभरा, कांदा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. मनमाड मध्ये सलग पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने या ठिकाणचा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
  • 19 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज : राज्यात 19 तारखेपर्यंत विविध भागांमध्ये विजांचा गडगडात व वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच शुक्रवार पर्यंत गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. शुक्रवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसासह गारपीट झाली. दुपारनंतर नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली होती.
  • शेतकरी अडचणीत : नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशभरात द्राक्षांची निर्यात केली जाते. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक द्राक्षांना तडे गेल्याने आता ही द्राक्ष निर्यातक्षम राहिली नाहीत. त्यामुळे लाखो रुपये खर्च केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवला जातो आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी करतो आहे.
Previous Post

जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
हजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा

Next Post

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026