No Result
View All Result
- सोलापूर – शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन तात्काळ लागू करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापूर शहरात आज जुनी पेन्शन लागू करणे साठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत भव्य मोर्चा चे आयोजन करणेत आले होते. २५ हजार पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन लागू करा. कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करा. वेतन त्रुटी दूर करा अशा मागण्यांनी आज सोलापूर शहरातील मार्ग दुमदुमले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा डाॅ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत भव्य मोर्चा काढणेत आला. शतनु गायकवाड,अशोक इंदापुरे यांची भाषणे झाली.
- या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राम शिंदे, अमृत कोकाटे, विरूपाक्ष घेरडे, अविनाश गोडसे, अरूण क्षीरसागर, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव,दिनेश बनसोडे, नागेश पाटील विवेक लिंगराज, जनार्दश शिंदे, वाय पी कांबळे, बापूसाहेब सदाफुले, शिक्षक नेते सुरेश पवार प्रमुख उपस्थित होते. शिक्षण शिंदे यांनी सुरूवातीला जुनी पेन्शन ची प्रतिज्ञा देऊन प्रायेकरिता भाषण व्यक्त केले.
या मोर्चात जिल्हयात ११ तालुके तसेच सोलापूर शहरातील कर्मचारी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेक वेषभुषा करून कर्मचारी जुनी पेन्शन ची मागणी साठी लक्षवेधी घेत होती. पायी चालत निघालेला या मोर्चाने शहरात एकेरी वाहतुक करणेत आली होती.
- शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन तात्काळ लागू करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. या शासनाला जाग आणणेसाठी लाखो शासकीय कर्मचारी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सहित जुनी पेन्शन योजना लागू करा. छोटी राज्य पेन्शन चा निर्णय घेतात. आपले राज्य आर्थीक दृष्ठ्या सक्षम नाही का? वरिष्ठ अधिकारी काय करतात? त्यांचे लक्षात येत नाही का? समृध्द असणारा महाराष्ट्र का पेन्शन देऊ शकत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तू करत शासनाला धारेवर धरत आमदार प्रणिती शिंदे यांनी घोषणा देत जुनी पेन्शन ची मागणी केली.
- मेस्मा ची भिती दाखवू नका. तुरूंगात जाणेची तयारी – माजी आमदार आडम
माजी आमदार नरसय्या आडम यांनी शासनावर हल्लाबोल करीत तात्काळ पेन्शन सुरू करा. कोरोनामध्ये जीवावर उदार होऊन जनतेचे रक्षण करणारे कर्मचारी यांना जुनी पेन्शन नाकारून बक्षिस दिले का? असा सवाल उपस्थित करीत राज्यातील कंत्राटी कर्मचारी अस्वस्थ आहेत. दुसरी कडे कामगारांची पिळवणूक सुरू आहे. शासनास जाग आणणे साठी तुरूगांत जाणेची तयारी आहे. मेस्मा ची भिती दाखवू नका. तुरूंगात जाणेची तयारी आहे असेही माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.
- माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे यांनी शासकीय कर्मचारी निवडणुकीसाठी चालतात, कोरोनात चालतात, मग यांना जुनी पेन्शन का चालत नाही? यासाठी आखडता हात घेऊ नका असे आवाहन केले.
- या प्रसंगी शतनु गायकवाड,अशोक इंदापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. आम आदमी पार्टी ने जुनी पेन्शन व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणे साठी जाहिर पाठिंबा देणेचे पत्र सुपूर्द केले. या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राम शिंदे, अमृत कोकाटे, विरूपाक्ष घेरडे, अविनाश गोडसे, अरूण क्षीरसागर, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव,दिनेश बनसोडे, नागेश पाटील विवेक लिंगराज, जनार्दश शिंदे, वाय पी कांबळे, सचिन सोनकांबळे, बापूसाहेब सदाफुले, जनार्दश शिंदे, म . ज. मोरे , अनिरुद्ध पवार ,बाबासाहेब इंगळे, राजकुमार पांडेकर, विजय विजापुरे, दिलावर मनियार, मल्लिकार्जून हुनरे, महोदय बनसोडे, प्रकाश चव्हाण, राजु कय्यावाले, इंदापुरे, अविनाश लोंढे, धनंजय माळवे, आशा कसबे, संध्या गावडे, राम शिंदे, किरण काळे, प्रशांत संपे, मनिष सुरवसे, महेश जेटीथोर, प्रसाद सोनवणे, नरेश बोनाकृती, ज्योतीराम शिंदे, संतोष दिक्षीत गिरीष जाधव, विवेक लिंगराज, नागेश पाटील, अविनाश गोडसे, संतोष जाधव, दिनेश बनसोडे, भिमाशंकर कोळी,लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, , मोहित वाघमारे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, सचिन घोडके, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे , रणजीत घोडके, गुरु रेवे, चेतन वाघमारे, श्रीकांत धोत्रे, महेश सुतार, चेतन भोसले, बसवराज डमडमे , बसवेश्वर मोटे, सुरज देवदास, संजय कांबळे, सटवाजी होटकर, शंकर जाधव, अमर रिजोरा, उमेश कोळी, विशाल गावडे, अमर भिंगे यांचेसह पदाधिकारी यांचेसह पदाधिकारी यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
No Result
View All Result