No Result
View All Result
- करोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला. चीनमधूनच करोनाचा फैलाव झाला या दाव्यावर अनेक देश ठाम आहेत. तसंच यासाठी वटवाघूळ कारणीभूत असल्याचे दावेही करण्यात आले. दरम्यान आता चिनी वैज्ञानिकांनी एक दावा केला असून करोनाच्या फैलावासाठी वटवाघून नव्हे तर रॅकून हा प्राणी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या तीन वर्षानंतर चीनने हा दावा केला आहे. दरम्यान चीनने हा अभ्यास सार्वजनिक केला असला तरी त्यातील निरीक्षणं मात्र समोर आणलेली नाही.
- चीनमधील वुहान येथील बाजारात रॅकून प्राण्यांची अवैधपणे विक्री होत होती असं बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनवर डेटा लपवल्याला तसंच उशिराने माहिती दिल्याचा आणि सार्वजनिक न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान WHO च्या काही वैज्ञानिकांनी डेटा मिळवला असून, त्याचा अभ्यास केला जात आहे.
- WHO ने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या CDC ने नुकताच एक डेटा अपलोड केला आहे. चीनमधून मिळालेल्या या डेटाचा अभ्यास केला जात आहे. NYT च्या रिपोर्टनुसार, जेनेटिक मटेरियल रॅकूनशी जुळत आहेत. हे करोनाचा फैलाव करण्यात सक्षम आहेत. करोनाचा फैलाव झाल्यानंतर चीनमधील सीफूड मार्केट बंद करण्यात आलं होतं. तिथे जनवारांनाही हलवण्यात आलं होतं. वैज्ञानिकांशी करोनाच्या कारणांचा शोध घेताना फरशी, पिंजरे आणि प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून नमुने घेतले होते.
- दरम्यान सध्या तरी करोनाचा फैलाव होण्यासाठी वटवाघूळ किंवा रॅकून जबाबदार आहे सांगता येणार नाही. किंवा एखाद्या प्रयोगशाळेतून लीक झाला आहे असंही स्पष्ट सांगता येणार नाही. WHO च्या म्हणण्यानुसार, चीन जितकी माहिती देतं, त्यापेक्षा जास्त लपवतं. यामुळे योग्य विश्लेषण करणयात अनेक अडचणी येत आहेत. चीन हा डेटा 3 वर्षांपूर्वीही शेअर करु शकत होतं असं WHO चं म्हणणं आहे. आम्ही चीनकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत. आताही आमच्याकडे पूर्ण माहिती नाही. आम्हाला वेळेवर डेटा दिला जात नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
No Result
View All Result