No Result
View All Result
- सोलापूर – शहरात नो डिजिटल झोन मध्ये डिजिटल लावल्यास ते तातडीने काढण्यात यावेत तसेच कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिले आहेत.
- सोलापूर शहरांमध्ये विविध ठिकाणी नो डिजिटल झोन म्हणून यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डिजिट फलक लावण्यास मनाई आहे मात्र काही ठिकाणी डिजिटल फलक लावण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे नो डिजिटल झोनमध्ये लावण्यात आलेले डिजिटल फलक तातडीने काढावेत आणि यापुढे मनाई करावी तसेच लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली. यापूर्वीही आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे सुरूवातीच्या काळात यावर निर्बंध आले मात्र पुन्हा नो डिजीटल झोनमध्ये बोर्ड लावण्यात आल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्यानंतर संबंधितांना कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला.
No Result
View All Result