सोलापूर समाज कल्याण वादग्रस्त सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांची उचल बांगडी करून बदली…
येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी कैलास आढे यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल वेळोवेळी धरणे आंदोलन,उपोषण,महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,अँटी करप्शन विभाग सोलापूर. यांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी केलेले गैरकृत्य व भ्रष्टाचार बाबत सातत्याने मागणी लावून धरली होती. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय संस्थांना वेटीस धरून खोटे नाटे आरोप करून कायद्याचा धाक दाखवून लाखो करोडो रुपये गैरकारभार करून उकळत होता त्यामुळे मागासवर्गीयांना अक्षरशा रडकुंडीला आणले होते.नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पाठपुरावा करून शासन दरबारी आवाज उठविला होता त्याची दखल घेत शासन दरबारी कडून त्याची सोलापूर जिल्ह्यातून उचलबांगडी करून त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी नवनाथ चौगुले साहेब यांची नियुक्ती करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय संस्थानी सुटकेचा निस्वास घेतलेला आहे.
अनेक मागासवर्गीय संस्था यांनी सदर भ्रष्ट अधिकारी कैलास आडे याची उचल बांगडी करण्यासाठी सातत्याने धरणे आंदोलन,उपोषण व शासन दरबारी पाठपुरावा केल्याने नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानत आहेत.