सोलापूर – दुचाकी क्षेत्रात विविध प्रकारच्या अत्याधुनिक फिचर्स आणले जात असून, उद्योग जगतात प्रसिद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटरइंडिया या कंपनीने ग्राहकांसाठी ‘अॅक्टीवा एच स्मार्ट’ या नव्या मॉडेलची स्कूटर बाजारात सादर केली आहे.
सोलापुरातील जुन्या एम्प्लायमेंट चौकातील ग्राहकाभिमुख असलेल्या कायझन होंडा या कंपनी शोरूममध्ये आज सोमवारी या आधुनिक स्कूटीचा अनावरण सोहळा सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तेरनारकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी कायझन होंडाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन बिज्जरगी यांच्यासह कंपनी शोरूममधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकवर्गही उपस्थित होते.
नव्या अॅक्टिवा एच स्मार्ट या स्कूटीमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देताना स्मार्ट चावीचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे ग्राहक जरी स्कूटर पासून दोन मीटरच्या परिसराच्या बाहेर जाईल, तेव्हा स्कूटर ही अॅटोमॅटिक लॉक होईल. यात सीट लॉक, हॅण्डल लॉक यांचा समावेश आहे. त्यामुळे घाईगडबडीत लॉक करण्याचे राहून गेल्यास, या फिचरद्वारे स्कूटी चोरीला जाण्याची भीती राहणार नाही.
गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेले वाहन पटकन शोधण्यासाठी कंपनीने स्मार्ट फाइंड हे फिचर आणले आहे. याद्वारे ग्राहकांना पार्किंगच्या गर्दीत स्मार्ट की वरील अॅन्सर बॅक बटण दाबल्यास स्कूटीचे चारही इंडीकेटर हे ब्लिंक होतील आणि ग्राहकांना आपली स्कूटी शोधण्यास सुलभ होणार आहे.
या स्मार्ट स्कूटर पहिले ग्राहक म्हणून महेश निकंबे यांना मान मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री कुंभार यांनी केले. या नव्या स्कूटीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता असून, ग्राहकांना याचे फिचर्स आवडतील असा आशावाद व्यवस्थापकीय संचालक नितीन बिज्जरगी यांनी व्यक्त केले.