उद्धव ठाकरे सरकारचा घोळात घोळ सुरूच आहे. लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार… त्यानंतर न झालेले खातेवाटप यामुळे उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत आहेत. असे असतानाच शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच दिवसताच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज होते, असं सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.