• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

2024 मध्ये काँग्रेस नव्हे, भाजपची खरी लढत यांच्यासोबत; सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2023
in मुख्य बातमी
0
2024 मध्ये काँग्रेस नव्हे, भाजपची खरी लढत यांच्यासोबत; सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर
0
SHARES
1
VIEWS

2024 मध्ये भाजपला काँग्रेस नाही, तर इतर पक्षांकडून जोरदार टक्कर मिळणार आहे. जाणून घेऊया आकडेवारीनुसार, कोण देणार कडवी झुंज..?
2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपनं (BJP) पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनंही काम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसशिवाय इतर पक्षांकडून कडवी टक्कर मिळणार आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणात सर्व पक्षांचे वोट शेयर पाहिलं तर, काँग्रेस भाजपपेक्षा खूपच मागे आहे. पण इतर पक्षांबाबत बोलायचं झालं तर ते भाजपच्या बरोबरीत आहेत. सर्वेक्षणात एकूण मतांपैकी 22 टक्के मतं काँग्रेसला, तर 39-39 टक्के मतं भाजप आणि इतरांना मिळत असल्याचं दिसून आलंय.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असली, तरी मतांच्या टक्केवारीतील चढ-उतार किती फायदेशीर किंवा हानीकारक ठरू शकतात, हे भाजपला चांगलंच माहित आहे. 2014 मध्ये, भाजपच्या मतांच्या वाढीमुळे पक्ष एका झटक्यात सत्तेवर आला होता, तर पाच वर्षांपूर्वी 2009 मध्ये 200 हून अधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या पदरात मात्र निराशा पडली होती. 2014 मध्ये काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून इतर पक्षांच्या मतांमध्ये घट होत आहे, ही भाजपसाठी दिलासादायक बाब ठरू शकते. दीड वर्षात झालेल्या तीन सर्वेक्षणांमध्ये इतर पक्षांचा आकडा 43 टक्क्यांवरून 39 टक्क्यांवर घसरला आहे. भाजपचा वोट शेअर 2 टक्क्यांनी वाढून 37 वरून 39 वर पोहोचला आहे. 2019 मध्ये इतर पक्षांना 43 टक्के मतं मिळाली होती, ज्यात वाढ झाली आणि ऑगस्ट 2021 च्या सर्वेक्षणात ती 46 टक्क्यांपर्यंत पोहोचली.
आता काँग्रेसचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तीन सर्वेक्षणांमध्ये 2 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी 2022 मध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी 20 टक्के होती, जी ऑगस्ट 2022 मध्ये 21 टक्के आणि जानेवारी 2023 मध्ये 22 टक्के झाली आहे.
10 वर्षात भाजप आणि काँग्रेसची परिस्थिती काय?
2009 ते 2019 या दरम्यान तीन लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली, तर भाजपसाठी चांगली गोष्ट म्हणजे, त्यांच्या मतांची टक्केवारी सातत्यानं वाढत आहे. 2009 मध्ये भाजपला 18.8 टक्के मतं मिळाली होती. यानंतर 2014 च्या मोदी लाटेत पक्षाला 31.34 टक्के मतं मिळाली होती, तर मोदी लाट 2.0 मध्ये भाजपला 37.76 टक्के मतं मिळाली होती. या तीन निवडणुकांमध्ये 2009 मध्ये काँग्रेसला 28.55 टक्के मतं मिळाली होती. तर, 2014 आणि 2019 मध्ये त्यांना अनुक्रमे 19.52 आणि 19.70 टक्के मतं मिळाली होती.
2024 मध्ये देशात सरकार कोणाचं?
आज निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार बनणार? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. लोकांनी एनडीएच्या बाजूनं बहुमत दिलं. सर्वेक्षणानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 298 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला गेल्या निवडणुकांच्या तुलनेत फायदा होताना दिसतोय. यूपीएला 153 जागा मिळू शकतात.

Previous Post

27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार

Next Post

शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर…उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर…उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार

शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर...उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026