No Result
View All Result
- माविआ काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी मागच्या वर्षी राज्यव्यापी संप केला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. मात्र, त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर तब्बल सहा महिने सुरू होता.
- संपकाळात तब्बल १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप देशभरात प्रचंड गाजला होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. मात्र, त्यांची मुख्य मागणी अद्यापही मान्य झालेली नाही. याच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले होते.
- २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. तर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामध्ये मार्च २०२२ मध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचारी कामावर हजर झाले होते. याच दरम्यान, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे १२४ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. या संपकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
No Result
View All Result