No Result
View All Result
- अखेरच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. काँग्रेस व भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नसल्यानं आता ही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या डाँ, सुधीर तांबे यांनी माघार घेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काँग्रेसनं सत्यजीत तांबे आपले उमेदवार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटानं पाठिंबा दिला. आता या पाठिंब्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह असल्याचंही स्पष्ट झालं आहे. तर भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.
- काँग्रेस व भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नसल्यानं आता ही लढत प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) व शुभांगी पाटील यांच्यात होणार आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. बबनराव घोलप म्हणाले, सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात, नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोट बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला मविआचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला आहे.
- नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
No Result
View All Result