सोलापूर/शिवाजी सुरवसे : शहराला बकाल बनविणाऱ्या आणि सतत अतिक्रमणाला अभय देणाऱ्या खासदार आमदार तसेच कर्तव्यदक्ष नगरसेवकांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करायला हवा. सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी.. नितीन गडकरी ने 1000 कोटी रुपये जाहीर केलेले उड्डाणपूल करावे… सोलापूर शहरात नवे उद्योग धंदे आणावे.. समांतर जलवाहिनी तातडीने व्हावी.. स्मार्ट सिटी च्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी ..शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाई करावी.. याबाबत आपले लोकप्रतिनिधी ब्र शब्द देखील काढत नाहीत. डझनावर प्रश्नांची यादी तयार होईल .. याचा पाठपुरावा करण्याऐवजी रस्त्यावरील खोकी काढू नका ..बेकायदेशीर बांधकामे पाडू नका.. रीतसर महापालिकेच्या नियमानुसार गाळ्याचे भाडे वसूल करू नका. .. यासाठी प्रशासनावर दबाव वाढवण्यासाठी मंत्र्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते. यामुळेच सोलापूर सुधारणार का आणि सोलापूरचे भविष्य काय याची चिंता अधिकच गडद होऊ लागली आहे. परंतु याला जबाबदार आपणच सोलापूरकर कारण ‘यथा प्रजा तथा राजा’ हेच सत्य.