• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर / करमाळा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे रखडले; परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकरी अडचणीत तर प्रशासन सुस्त

admin by admin
December 14, 2019
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

कायद्याच्या चौकटीत न अडवता शासनाने सरसकट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

गणेश जगताप

करमाळा – तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी वर्गास हैराण केले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे तर कापणी करण्यात आलेले पीक अक्षरशः खराब झाले आहे. खरीप हंगामातील कांदा, सूर्यफूल, बाजरी, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. शासनाने खरीप हंगामातील पिकांना तात्काळ पंचनामे करून सरसकट पीकविमा मंजूर करावा तसेच रब्बी हंगामातील पिकांचे तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तालुक्यासह जिल्ह्यात पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे मतदार संघातील पीक नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तालुक्यातील मंडळामधील पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची गरज आहे.

पावसाळा संपला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. मागील काही दिवसापासून तालुक्यात पावसाची दमदार हजेरी आहे. पावसामुळे ज्वारी, मका, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी तालुक्यात अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू नाही. नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार आणि नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बहुतांश शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेअंतर्गत विमा काढला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भेटला नसल्याने यंदा पीक विमा काढला नाही. नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हे शासनाच्या मदतीकडे आस लावून आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचणी अडचण येत आहेत. तसेच शासनाकडून अद्यापही करमाळा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. त्यातच शासनाकडून ४८ तासात शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळवावी अशी जाचक अट घातली आहे. काही शेतकऱ्यांच्या शिवारातून पाणी वाहत आहे. पर्यायाने शासनाला शेतकऱ्यांनी मदत द्यायची आहे की नाही असा संशय प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी पडत आहे?

ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा. कारण अनेकांचे पीक शेतातून काढता आले नाही. त्यामुळे पाऊस झाल्याने पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शासनाने पिक विमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यात मका 3952 हेक्टर, तुर 4342 हेक्टर, बाजरी 3828 हेक्टर, कांदा 1178 हेक्टर, सुर्यफुल 1336 हेक्टर, मूग 1160 हेक्टर, उडीद 845 हेक्टर यासह आणखी पिकांची लागण शेतकऱ्यांनी केली आहे. पण पावसामुळे या पिकाला नुकसान पोहोचले आहे.

सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी थोड्याशा पडलेल्या पावसावर खरिपाची पेरणी केली मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकऱ्याची सत्वपरीक्षा न पाहता त्यांना कायद्याच्या चौकटीत न अडवता शासनाने सरसकट अनुदान द्यावे व त्यांना सहकार्य करावे. – हरिश्चंद्र झिंजाडे (शेतकरी, पोथरे)

गेली दोन- तिन वर्षे शेतकरी दुष्काळी परिस्थीती मुळे खचला आहे. शेतकरी अगोदरच हवालदिल आहे. त्यातच परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाने शेतात पाणी साचले आहे. ज्वारी पिवळी पडली असुन ज्वारी वर आळी पडल्याचे दिसत आहे. मात्र कृषी विभाग व महसुल विभाग सुस्त आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जावुन तात्काळ पंचनामे करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल. – शाहुराव फरतडे (शिवसेना माजी तालुका प्रमुख करमाळा)

Previous Post

social / एसटी महामंडळही बसवणार ट्रॅकिंग सिस्टिम, गाड्यांचे लोकेशन कळणार

Next Post

टी-२० लीग / आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post

टी-२० लीग / आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026